Ad will apear here
Next
रत्नागिरीत ‘झिपलाइन’ला मुलांचा प्रतिसाद


रत्नागिरी : रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या संस्थेतर्फे प्रजासत्ताकदिनी भाट्ये पुलावरून भाट्ये किनार्‍यापर्यंत झिपलाइन या गिर्यारोहणातील साहसी क्रीडा प्रकाराचे आयोजन केले. संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त संस्थेने अनेक साहसी उपक्रम हाती घेतले आहेत.

झिपलाइनसाठी सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्यात आली होती. भाट्ये पुलापासून किनार्‍यापर्यंत सुमारे साडेचारशे फुटांचा मजबूत दोरखंड बांधला होता. यामध्ये मुलाला सीट हार्नेसवरून पुलीच्या साह्याने दोराला लटकवले गेले आणि बर्ड व्ह्यूने समुद्र, किनारा पाहण्याचा आनंद मुलांनी घेतला. आठ ते १८ वयोगटातील ८३ मुले यामध्ये सहभागी झाली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रत्नदुर्ग माउंटेनीअर्सचे फिल्ड इनचार्ज जितेंद्र शिंदे, गणेश चौघुले, अध्यक्ष शेखर मुकादम, वीरेंद्र वणजू, नेत्रा राजेशिर्के, संजय खामकर, पराग सुर्वे, गौतम बाष्टे, हर्ष जैन, प्राजक्ता राऊत, प्रांजली चोप्रा, सनील डोंगरे, दीप नाचणकर, संतोष दैत, धीरज डांगे आदी सभासदांनी मेहनत घेतली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZIDBW
Similar Posts
प्रजासत्ताक दिनी मुले अनुभवणार ‘झिपलाइन’चा थरार रत्नागिरी : येथील रत्नदुर्ग माउंटेनीअर्सतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०१९ रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत शहरातील भाट्ये पुलावरून रॅपलिंगचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी संस्था २५ व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याने खास आठ ते १८ वयोगटांतील मुलांना झिपलाइन (Zipline) हा साहसी क्रीडा प्रकार अनुभवता येणार आहे
रत्नदुर्ग किल्ल्यावर मुलांनी गिरवले धाडसाचे धडे रत्नागिरी : गिर्यारोहण क्षेत्रात रत्नागिरीत कार्यरत असलेल्या रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या संस्थेने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने संस्थेने मुला-मुलींसाठी रत्नदुर्ग किल्ल्यावर तीन दिवसांच्या साहसी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण शिबिरात स्थानिक मुला-मुलींसह मुंबई,
रत्नागिरीतील भाट्ये पुलावरून झिपलाइन, रॅपलिंग रत्नागिरी : महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून, दोन ऑक्टोबर २०१८ रोजी रत्नदुर्ग माउंटेनीअर्स संस्थेने रत्नागिरीतील भाट्ये पुलावरून झिपलाइन व रॅपलिंग या दोन साहसी क्रीडा प्रकारांचे आयोजन केले होते. रत्नागिरीतील पर्यटनवाढीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता
रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी रत्नागिरी : रम्य कोकणातील रमणीय रत्नागिरी आणि आसपासचा परिसर पाहून हरखून जाणाऱ्या पर्यटकांना आता तेथील निसर्गसौंदर्याचा आणखी आस्वाद घेता येणार आहे. उंच कड्यावरून खाली अथांग पसरलेल्या समुद्राकडे झेप घेता येणाऱ्या ‘सी-व्हॅली क्रॉसिंग’पासून समुद्राखालच्या रंगीबेरंगी दुनियेचे दर्शन घडविणाऱ्या स्कूबा डायव्हिंगपर्यंतच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language